संगमनेर(DSNews24/किरण पुरी) भारतातील लोकशाही जगातील सर्वात मोठी सक्षम लोकशाही आहे. आजचा तरुण हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. तरुणांची शक्ती विधायक मार्ग वळविल्यास भारत देश जागतिक महासत्ता होऊ शकेल, यासाठी प्रत्येक तरुणांनी मतदार होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. लोकशाहीला आर्थिक बळकट करण्यासाठी महाविद्यालयातील प्रत्येक युवक युवतींनी मतदार नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता राठोड यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंचाच्या वतीने युवा मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ हेमलता राठोड होत्या. तर व्यासपीठावर कामगार तलाठी विक्रम ओतारी, केशव शिरोळे, उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप, रंजीत गिरी, कार्यक्रम समन्वयक प्रा. जया रकटे व संदीप खेमनर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कामगार तलाठी विक्रम ओतारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी अभियानामध्ये आपली नोंदणी करावी. लोकशाही टिकून ठेवणे आपल्या सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे. यासाठी 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी विवेक पूर्ण मतदार बनणे आवश्यक आहे, यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार नाव नोंदणी करावी.
या कार्यक्रमासाठी प्रा. म्हतु खेमनर, प्रा.दत्तात्रय आसवले, प्रा.पोपट खेमनर, प्रा.राजेंद्र लेंडे, प्रा. गणेश साळुंखे, प्रा. योगेश साळुंखे, प्रा. गणेश कुलकर्णी, प्रा. कल्पना शेळके, प्रा. प्राजक्ता बिडवे, प्रा. शबाना शेख, प्रा. लक्ष्मण कातोरे, प्रा. स्वाती ढोकरे, प्रा. वृषाली डोके, प्रा. प्रियंका हाके, प्रा.आरजू शेख, प्रा. स्वाती सागर, प्रा. शेख, मनोहर दूरगुडे, पुंजाहरी वारे, महेश पोखरकर, लक्ष्मण जाधव, भाऊसाहेब बहिरट, शंकर राशिनकर व सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक प्रा. जया रकटे यांनी केले तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक प्रा. म्हतू खेमनर यांनी केले तर आभार प्रा.संदीप खेमनर यांनी मानले.
