नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना आव्हान दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष काढून 5 आमदार निवडून आणून दाखवा, असं आव्हान संजय राऊत म्हणालेत.
राज ठाकरे, नारायण राणे आणि इतर सर्व नेत्यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे असतात. त्यामुळे उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत. हे सर्व नेते फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतात म्हणजे उद्धव ठाकरे यांची त्यांना भीती वाटते, असंही संजय राऊत म्हणालेत. ते नाशिकमधील मालेगावमध्ये बोलत होते.
