देवेंद्र फडणवीस यांनी जर मला मुख्यमंत्री करणार असे बोलले असते तर संपूर्ण पक्षच घेऊन आलो असतो, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
प्रा.डॉ.प्रदीप ढवळ लिखित ‘योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी अजित पवार तुफान फटकेबाजी केली. अजित पवार आपल्या मिश्किल बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. याचाच प्रत्यय उपस्थितांना यावेळी आला.
काय म्हणाले अजित पवार?
ठाण्याच्या या ऐतिहासिक नगरीत खुप काही घडलंय. सामान्य नागरीक ते मुख्यमंत्री असा प्रवास एकनाथराव शिंदे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांची टर्म 99 साली सुरु झाली. एकनाथ शिंदेंची कारकिर्द 2004 ची आहे. मी यांच्या आधीचा आहे, हे सर्व पुढे गेले मी तिथेच राहिलोय. मी देवेंद्र फडणवीस यांना म्हणालो मला जर मुख्यमंत्री करणार असं बोलले असते तर संपुर्ण पार्टीच घेवून आलो असतो. मला जर संधी दिली असती तर मी पूर्ण पार्टी आणली असतीय त्यांनी तर फक्त आमदराच आणले. आता वेळ निघून गेली. माझे आणि फडणवीस-शिंदे यांचे संबंध आधीपासूनच चांगले आहेत.
