संपूर्ण भारताला ज्याची प्रतिक्षा होती त्या सामन्याचा निकाल लागला आहे. भालाफेक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने रौप्यपदकाला गवसणी घातली.
नीरजने 89.45 मीटर भाला फेकून इतिहास रचला. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटरचा थ्रो केला आणि गोल्ड मेडल पटकावलं. नीरज भारताचा दुसरा पुरूष खेळला आहे, ज्याने दोन ऑलिम्पिक पदक पटकावली आहे. सुशील कुमारने देखील याआधी दोन ऑलिम्पिक पदक जिंकली होती.
कशी झाली फायनल?
नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल गेला. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटरचा थ्रो केला आणि ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडला. नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 चा थ्रो केला. नीरजचा तिसरा थ्रो देखील फाऊल गेला. तिसऱ्या राऊंडनंतर 12 पैकी 8 खेळाडू पुढील राऊंडसाठी कायम राहिले. पहिल्या तीन राऊंडनंतर नीरज दुसऱ्या क्रमांकावर होता.
नीरज चोप्राचा चौथा थ्रो देखील फाऊल गेला. नीरजच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. नीरज चोप्राचा पाचवा थ्रो देखील फाऊल गेला अन् भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न फिक्कं दिसू लागलं. नीरजकडे आणखी एक संधी होती. त्यामुळे नीरजने पूर्ण फोकस केला. नीरजने पाचव्या राऊंडपर्यंत दुसऱ्या स्थानी कायम होता. नीरजचा सहावा थ्रो देखील खास ठरला नाही. अशाप्रकारे नीरज चोप्राने भारतीयांना नाराज न करता आणखी एक पदक मिळवून दिलं आहे.
