राधाकृष्ण विखे पाटील भडकले, म्हणाले मनोज जरांगे यांनी गोलमेज….

Radhakrishna Vikhe Patil : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली.

मात्र, हा तिढा अद्याप न सुटल्यानं जरांगे पाटील हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत आहे. माझ्याविरोधात फडणवीस इतरांना बोलायला लावत आहेत. ते मराठे मराठ्यांच्या अंगावर घालत आहेत, असा आरोप जरांगेंनी केला. दरम्यान, जरांगेकडून होत असलेल्या टीकेला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रत्युत्त दिलं.

जरांगे पाटील यांनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये, असे म्हणत विखे पाटील यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली.

राधाकृष्ण विखेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. जरागेंविषयी विचारल असता ते म्हणाले, जरांगेंनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये, आरक्षणाच्या आडून फडणवीसांवर टीका करण्याचं जरांगेंनी थांबवावं असं विखे म्हणाले. यावेळी त्यांनी जरांगेंवर टीकाही केली. मनोज जरांगे यांनी गोलमेज परिषद घ्यावी आणि त्यात काँग्रेसच्या बोलघेवड्या आणि उबाठाच्या स्वयंघोषित नेत्यांना बोलवावं. मग दूध का दूध पानी का पानी होईल, असं म्हणत विखेंनी जरांगेंवर तोफ डागली.

Leave a Comment