बाळासाहेब थोरात अजितदादांवर कडाडले, म्हणाले….

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा (Jansanman Yatra) नाशिकपासून सुरु झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.

अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) बोलताना ही योजना सुरू राहण्यासाठी तुम्ही आमचे बटण दाबले पाहिजे. तुम्हाला निवडणुकीत महायुतीचे बटण दाबायचे आहे. तिन्ही पक्षाचे बटण दाबू नका. एकच पक्षाचं बटण असणार आहे. महायुतीच्या पक्षाचं बटण दाबा, असे वक्तव्य केले. आता यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अजित पवारांसह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी यांच्या पुढील बटण दाबावं लागेल याचा अर्थ असा यांना लाडकी बहीण नाही, सत्ता हवी आहे. ही लाडकी सत्ता मिळवण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड आहे. मात्र हे सगळं जनता ओळखून आहे, असे हल्लाबोल त्यांनी केला आहे. तर अजित पवारांच्या जनसंवाद यात्रेत सर्वत्र गुलाबी रंग दिसत आहे. यावरूनदेखील बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांना डिवचले आहे. रंग गुलाबी करून काय उपयोग आहे? लोकांनी सगळं तुमचं अनुभवलेलं आहे. त्याचा ठसा एवढा उमटलेला आहे की आता गुलाबी करून काही होईल, असं मला वाटत नसल्याची टीका बाळासाहेब थोरातांनी केली आहे.

Leave a Comment