मांडवे बुद्रुक सोसायटीच्या चेअरमन पदी रूपेश धुळगंड व व्हा चेअरमन पदी कासम सय्यद बिनविरोध 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठार भागातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजली जाणाऱ्या मांडवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या चेअरमनपदी रूपेश दत्तात्रय धुळगंड व व्हा. चेअरमन पदी कासम चंदू सय्यद यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली व थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, शेतकरी विकास गटाचे अध्यक्ष प्रा. रामदास धुळगंड सर, माजी सरपंच भाऊसाहेब डोलनर, माजी सरपंच चिमाजी धुळगंड, अमृता धुळगंड, भाऊसाहेब धुळगंड वायरमन, रेवजी धुळगंड, रंगनाथ धुळगंड, गंगाधर डोलनर, तात्यासाहेब धुळगंड यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन व व्हा चेअरमन पदांची निवड करण्यात आली. 

संस्थेचे तत्कालीन चेअरमन चिमाजी धुळगंड व व्हा. चेअरमन बबन गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे चेअरमन व व्हा चेअरमन पदाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या दोन्ही जागेवर निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रिया संगमनेर येथील उपनिबंधक कार्यालयातील सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी उपनिबंधक संतोष कोरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा सोसायटीचे सचिव पोपट गळंगे यांनी कामकाज पाहिले.

दरम्यान चेअरमनपदासाठी रूपेश धुळगंड व व्हा चेअरमन पदासाठी कासम सय्यद यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. त्यामुळे ही निवड प्रक्रिया बिनविरोध करण्यात आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर गोरे यांनी केली. या निवडणूक प्रक्रियेवेळी सोसायटीचे १२ संचालक हजर होते तर १ संचालक गैरहजर राहिला होता.

यावेळी चेअरमन पदी रूपेश धुळगंड व व्हा चेअरमन पदी कासम सय्यद यांची बिनविरोध निवड झाल्याने शेतकरी विकास मंडळाच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला. संगमनेर युवक काँग्रेसचे सरचिटणीस तथा नुतन चेअरमन रूपेश धुळगंड हे स्व.लक्ष्मणनाना धुळगंड यांचे नातू व प्रा. रामदास लक्ष्मण धुळगंड सर यांचे पुतणे आहेत.

मांडवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची स्थापना १९६१ असून जवळपास ६४ वर्षांपासून या संस्थेवर कॉंग्रेस पक्षाचा दबदबा राहिला आहे. पठार भागात ही सोसायटी अग्रगण्य समजली जाणारी आहे. या सोसायटीत १३ संचालक असून १०५० सभासद आहे. तसेच दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात येते. त्यामुळे सोसायटीचा कारभार उत्कृष्ट राहिला आहे. गेल्या १७ वर्षांपासून सोसायटीचे सचिव म्हणून पोपट रेवजी गळंगे हे कार्यरत आहे. ते देखील उत्कृष्ट सेवा देत आहे.

या निवडीवेळी संचालक लहानभाऊ धुळगंड सर, दिपक धुळगंड, सेल्समन हरिभाऊ धुळगंड, सुबेदार बाळशिराम झिटे, अनिल डोमाळे, तुषार धुळगंड, म्हाळू धूळगंड, दत्ता धुळगंड, विठ्ठल तरंगे, किसन तरंगे, सखाराम सोडनर, दगडू धुळगंड, राजू डोमाळे, सुर्यभान बाचकर, मल्हारी सोन्नर, मारूती डोलनर, बबन खेमनर, याकूब भोसले, ललित धुळगंड, मिराबाई डोलनर, इंदुबाई बाचकर, भारत धुळगंड, संतोष गायकवाड यांच्या सह संचालक मंडळ उपस्थित होते.

Leave a Comment