मांडवे बुद्रुक सोसायटीवर चेअरमनपदाची प्रथमच युवकाला संधी – शंकरराव खेमनर 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्याच्या साकूर पठार भागातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजली जाणाऱ्या मांडवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रूपेश दत्तात्रय धुळगंड व व्हा. चेअरमनपदी कासम चंदू सय्यद यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली व थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, शेतकरी विकास गटाचे अध्यक्ष प्रा. रामदास धुळगंड सर, माजी सरपंच भाऊसाहेब डोलनर, माजी सरपंच चिमाजी धुळगंड, अमृता धुळगंड, भाऊसाहेब धुळगंड वायरमन, रेवजी धुळगंड, रंगनाथ धुळगंड, गंगाधर डोलनर, तात्यासाहेब धुळगंड यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन व व्हा चेअरमन पदांची निवड करण्यात आली. 

चेअरमन व व्हा चेअरमन पदांची नुतन निवड झाल्याबद्दल साकूर येथील ग्रामपंचायत सभागृहात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन रूपेश धुळगंड व व्हा चेअरमन कासम सय्यद यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी सत्कार केला. तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शंकर खेमनर म्हणाले मांडवे बुद्रुक सोसायटीचा कारभार उत्कृष्ट राहिला आहे. तसेच नवनिर्वाचित चेअरमन रूपेश धुळगंड यांनी कॉंग्रेस पक्षात एकनिष्ठ काम केले. तसेच प्रामाणिकपणे संघटनेत काम केलं. तसेच मांडवे सोसायटीवर युवक म्हणून चेअरमन पदाची प्रथमच संधी मिळाली.

नुकतेच संस्थेचे तत्कालीन चेअरमन चिमाजी धुळगंड व व्हा. चेअरमन बबन गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे चेअरमन व व्हा चेअरमन पदाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या दोन्ही जागेवर निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत चेअरमनपदासाठी रूपेश धुळगंड व व्हा चेअरमन पदासाठी कासम सय्यद यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. यावेळी चेअरमन पदी रूपेश धुळगंड व व्हा चेअरमन पदी कासम सय्यद यांची बिनविरोध निवड झाल्याने शेतकरी विकास मंडळाच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला.

या सत्कारावेळी सोसायटीचे माजी चेअरमन चिमा धुळगंड, माजी व्हा चेअरमन बबन भोसले, माजी व्हा चेअरमन बबन गायकवाड, संचालक भाऊसाहेब डोलनर, लहानू धुळगंड, भिकन शेख, राजेंद्र धुळगंड, बापू धुळगंड, साहेबराव डोलनर, मिराबाई डोलनर, इंदुबाई बाचकर, म्हतारबा सोडनर, बाबुराव झिटे आदी उपस्थित होते.

Leave a Comment