शरद पवारांच्या सुरक्षेबाबत मोठी बातमी 

राज्यात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील राज्यात चांगलाच तापलेला पाहायला मिळत आहे. बदलापूर येथील चिमुरडींवर अत्याचाराची घटना घडली आहे.

तसेच अनेक अशा घटना आहेत ज्या राज्यभरात घडत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात येणार आहे. शरद पवारांना आता झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून ही सुरक्षा दिली जाणार आहे.

शरद पवार यांना राज्य सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली आहे. मात्र आता त्यांना केंद्र सरकारकडून अतिरिक्त सुरक्षा देण्यात येणार आहे. त्यामुळे सीआरपीएफचे १० जवान आता शरद पवारांच्या सुरक्षेत असणार आहेत. नुकताच सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर पवारांना केंद्राची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवारांच्या घरी दररोज अनेक बैठका होत असतात. शेकडो लोक त्यांना भेटण्यासाठी येत असतात. बदलापूर प्रकरणानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. कोणताही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

झेड प्लस ही सुरक्षा राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा अत्यंत महत्त्वाच्या लोकांना दिली जाते. या सुरक्षेत एका पोलिस अधिकाऱ्यासह १० पेक्षा जास्त एसपीजी कमांडो असतात. सुरक्षेची पहिली फेरी ही एनएसजी हाताळत असते. दुसरी फेरी ही एसपीजी कमांडो हाताळत असतात. यात आयटीबीपी आणि सीआरपीएफ कमांडोंचा समावेश असतो. झेड प्लस सुरक्षेत एस्कॉर्ट आणि पायलट वाहनांची देखील सुविधा दिली जाते.

Leave a Comment