बाळासाहेब थोरातांचा मोठा गौप्यस्फोट, आम्हीही अजित पवारांविरोधात….

संगमनेर – अर्थमंत्री या नात्याने अजित पवार यांनी निधी वाटपात भेदभाव करायला नको, मात्र राष्ट्रवादीचे आमदार वगळता इतरांना निधी देताना हात आखडता घेतात, असा आरोप तत्कालिन एकसंध शिवसेनेचे अनेक आमदार आणि मंत्री महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात करायचे.

आताही महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्या अर्थखात्यावर शिंदेसेनेचे मंत्री नाराज असल्याचे समोर आले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थखाते हे सगळ्यात नालायक खाते आहे, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला. गुलाबराव पाटील यांच्या म्हणण्याला दुजोरा देणारे वक्तव्य काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात आम्हीही अजित पवार यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यामुळे मी गुलाबराव पाटील यांच्या मताशी मी सहमत आहे, असे थोरात म्हणाले. थोरात यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांच्यावरील निधी वाटप करताना भेदभावाचा शिक्का आणखीनच ठळक झाला आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधील ‘सुदर्शन’ निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना झाली. त्यानंतर पत्रकारांशी विविध राजकीय मुद्द्यांवर संवाद साधला. फडणवीस यांच्या आधुनिक अभिमन्यू वक्तव्यावरून त्यांनी टोला हाणला तर अजित पवार यांच्यावरील निधी वाटपाच्या भेदभावाच्या आरोपाला समर्थन दिले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, पाच वर्ष निधी वाटपात प्रचंड भेदभाव झाला. काही आमदारांना प्रचंड निधी तर काहींना निधीच दिला गेला नाही. पाच वर्षे भेदभाव करण्याचे काम अर्थ विभागाकडून झाले. पाच वर्षे हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही देखील तक्रार केली होती, असा गौप्यस्फोट बाळासाहेब थोरात यांनी केला.

Leave a Comment