नवी दिल्ली : बहराइचमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथला एक ट्रक ड्रायव्हर कामावर गेला होता. तो मध्यरात्री घरी परतला आणि त्याने घराचा दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली; पण कोणीही दार उघडलं नाही, त्यामुळे तो घराच्या छतावर चढला.
छत तोडून त्याने घरात डोकावून पाहिलं असता, त्याला जबर धक्का बसला. आत त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत होती. हा सर्व प्रकार पाहून तो संतापला. त्याने पत्नीच्या प्रियकराशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादावेळी धारदार शस्त्रानं वार करून त्याने प्रियकराची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
उत्तर प्रदेशातल्या बहराइचमध्ये रविवारी रात्री एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या प्रियकराची धारदार शस्त्रानं हत्या केली. ही घटना कैसरगंज पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. पती हालीमने पत्नीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. त्यानंतर त्याचं पत्नी आणि तिच्या प्रियकराशी जोरदार भांडण झालं. भांडणावेळी हालीम याने धारदार शस्त्राने प्रियकराची हत्या केली. जखमी पती आणि पत्नीला उपचारासाठी बहराइचच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.
हालीम हा ट्रक ड्रायव्हर आहे. तो अनेकदा कामानिमित्त घराबाहेर असायचा. रविवारी मध्यरात्री तो अचानक घरी गेला. त्याने दरवाजा वाजवला; पण बराच वेळ पत्नीने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याला संशय आला आणि तो घराच्या छतावर गेला. छत तोडून त्याने आत प्रवेश केला असता, त्याला पत्नी तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली. हे पाहून तो संतापला आणि त्याने दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. हा वाद विकोपाला पोहोचला आणि पतीने धारदार शस्त्रानं युवकाची हत्या केली.
एसपी (शहर) रामानंद कुशवाह यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं, की ‘हलीम नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. हत्येच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आणि आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपी हा शेजारच्या गावातला रहिवासी होता. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.’
