पुणे : पुण्यामधल्या काचेच्या कारखान्यात भीषण अपघात झाला आहे, या अपघातात कारखान्यात काम करणाऱ्या चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात येवलेवाडी भागात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका काचेच्या कारखान्यात माल उतरवला जात होता, त्यावेळी काचा फुटल्याने पाच कामगार गंभीर जखमी झाले होते.
या कामगारांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण चार कामगारांचा मृत्यू झाला तर एक कामगार गंभीर जखमी आहे. या चारही कामगारांचे मृतदेह सध्या ससून रुग्णालयात आहेत.
