गोसावी समाजाचे प्रमोद बन यांचं उपोषण चौथ्या दिवशी मागे 

लातूर : लातूर शहरामध्ये दशनाम गोसावी समाजाला दफनभूमीसाठी जागा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी ३० सप्टेंबरपासून दशनाम गोसावी समाज उत्कृष्ट मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बन यांनी उपोषण सुरू केले होते. अखेर चौथ्या दिवशी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे.

दरम्यान, समाजाच्या वतीने गुरुवारी उपोषणस्थळी निदर्शने करण्यात आली. लातूर मनपाकडे दफनभूमीसाठी जागा मिळावी, यासाठी अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. वारंवार आंदोलनेही करण्यात आली. मात्र दखल घेतली नसल्यामुळे ३० सप्टेंबरपासून मनपासमोर आमरण उपोषण करण्यात आले.

या उपोषणाला समाजाचा पाठिंबा मिळाला. तसेच अन्य समाज घटकांतूनही पाठिंबा देण्यात आला. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून दखल घेतली असून, दफनभूमीसाठी जागा देण्याचे मान्य केले आहे. जागा देण्याचे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेतल्याचे उपोषणकर्ते प्रमोद बन यांनी सांगितले.

Leave a Comment