श्रीरामपूरमधील माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना कालरात्री साडेअकरा वाजता त्यांच्या श्रीरामपूरमधील निवासस्थानातून ताब्यात घेत अटक करण्यात आली. मांजरी (ता. राहुरी) येथील महिलेने त्यांच्याविरोधात अत्याचाराचा फिर्याद दिली आहे.
माजी आमदार मुरकुटे कामानिमित्त श्रीरामपूरबाहेर होते. मुंबईत होते. काल रात्री ते शहरात दाखल झाले. त्यानंतर राहुरी पोलिस (Police) त्यांच्या श्रीरामपूरमधील निवासस्थानी पोचले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेत अटक केली. अटकेनंतर त्यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना, नगरमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माजी आमदार मुरकुटे यांना अटक झाल्याची माहिती समोर येताच, त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी सकाळी गर्दी केली होती. नगरच्या जिल्हा रुग्णालयात देखील गर्दी होती. भानुदास मुरकुटे नगर जिल्ह्यातील राजकारणात दबदबा आहे, त्यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
