राज्यासह देशातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता मार्च महिना संपत आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस गेल्या आठ दिवसांपासून हजेरी लावत आहे.
दुसरीकडे उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला. भारतीय हवामान विभागाने कोकणात दमट आणि उष्ण हवामानाचा येलो अलर्ट जारी केला. शक्यतो दुपारी यादरम्यान घरातून बाहेर निघणे टाळा. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट कायम आहे. धाराशिव, लातूर, सोलापूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावेल. यादरम्यान विजांचा कडकडाट देखील असेल.
दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये हवामान विभागाने उष्णतेचा येलो अलर्ट दिला असून पारा 39 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 5 दरम्यान नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळावे.
