शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचे विवाह जमण्यास मोठ्या अडी अडचणी येत आहेत त्यात शेतकरी नवरा नको गं बाई म्हणत मुली शेतकरी मुलांशी विवाह करण्यासाठी तयार होत नाही ही सर्व वस्तूस्थिती पाहीलेल्या संगमनेर तालुक्यातील दरेवाडी गावचे सरपंच आनंदा रावसाहेब दुरगुडे यांनी यावर एक वेगळीच शक्कल लढवली आहे.
गावातील मुलांची लग्ने जमवण्यासाठी त्यांनी शेतकरी अर्धांगिनी योजना दरेवाडी गावात कार्यान्वित केली आहे. शेतकरी वर्गातील मुले ही भरपुर काबड कष्ट करतात. मात्र या मुलांना कोणीही मुली देत नाही अशा मुलांची लग्न लवकरात लवकर व्हावी व समाजात एक चांगला संदेश शेतकऱ्यांविषयी जावा. हा चांगला दृष्टिकोन ठेवून दरेवाडी गावचे सरपंच आनंदा दुर्गुडे यांनी स्वखर्चातून शेतकरी अर्धांगिनी योजना आपल्या गावात कार्यान्वित केली आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न लवकरात लवकर व्हावीत यासाठी गावातील शेतकऱ्यांच्या मुलासोबत लग्न केले तर दरेवाडी गावचे सरपंच हे वैयक्तिक खर्चातून त्यांना पाच हजार रुपये व संसार उपयोगी साहित्य देणार आहेत. या योजननेला त्यांनी शेतकरी अर्धांगिनी योजना असे नाव देत ही योजना राबविण्याचे ठरविले आहे. तर सोशल मीडियावर तसा मेसेजही व्हायरल होत आहे.
दरेवाडी गाव ग्रामीण भागात असले तरी येथील मुलांचे शिक्षण देखील चांगले आहे.परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणांनी नोकऱ्या नाहीत. मुलांना नोकऱ्या मिळत नसल्याने दुर्दैवाने पारंपरिक शेती व्यवसाय करावा लागत आहे. हल्ली मुली शेतीत काम करण्यास नकार देत आहेत.मुलींच्या पालकांची विवाहबाबत असलेल्या अतिरिक्त अपेक्षा व मुलींचे वाढते वय याबाबत समाजात प्रबोधन होणे गरजेचे आहे.
आनंदा दुर्गुडे – सरपंच
महाराष्ट्रात एकीकडे सोलापूर जिल्ह्यात विवाह इच्छुक नवरदेवांनी काढलेल्या मोर्चा व विवाह इच्छुक तरुणाने मुख्यमंत्र्यांना पाठविलेली पत्र पाठवून समाजातील तरुणींन सोबत लग्न लावून देण्याबाबत घातलेले साकडे आपण पाहिले आहे.तर दुसरीकडे सरपंच आनंद दुर्गुडे सारख्या तरुण सरपंचाने विवाहयोग्य बळीराजाच्या मुलांसाठी अनोखी योजना राबविली आहे.ही शेतकरी अर्धांगिनी योजना अवघ्या महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरत आहे.
(अर्जुन कांगणे – शेतकरी)
