संगमनेर (DSNews24/किरण पुरी) – तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील रहिवासी असलेले शेतकरी दत्तात्रय कारभारी शेंडगे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून साकूर येथील चौफूलीवर गेल्या ९ वर्षांपूर्वी विरभद्र रसवंती गृह सुरू करत व्यावसायाकडे वाटचाल केली. तसेच उन्हाच्या तडाख्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने साकूर येथील चौफूलीवर दत्ता शेंडगे यांच्या विरभद्र रसवंतीगृहातून घुंगराचा आवाज कानी पडू लागला आहे.
त्यामुळे थंडगार उसाचा रस पिण्यासाठी प्रवाशी व नागरिकांची पावले आपोआप त्यांच्या रसवंती गृहाकडे वळू लागली आहेत. विशेषतः लाकडी चरख्यातून ऊसाचा रस काढला जात असल्याने ग्राहक गर्दी करताना दिसत आहेत. फेबुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे चार महिने उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये उसाला चांगली मागणी असते. तसेच उसाचा रस पिण्याकडे नागरिकांचाही सर्वाधिक कल आहे.
यामध्ये जास्त करून उसाचा रस, लिंबू, आलेयुक्त उसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान योग्य राखण्याचे काम होत असल्याने ताज्या रसाला अधिक मागणी आहे. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढवून माणसाला फ्रेश आणि ताजेतवानेही रसामुळे वाटते. लाकडी चरख्यातून ऊसाचा रस मिळत असल्याने ऊसाचा रस पिण्यासाठी साकूर चौफूलीवर येणारे जाणारे नागरीक विरभद्र रसवंतीगृहाकडेच जाताना दिसत आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून व्यावसायात उतरलेले दत्तात्रय शेंडगे यात यशस्वी झाले आहेत. तसेच या व्यवसायात त्यांचा जम देखील बसला आहे. विशेषतः घरच्या शेतातील ऊस वापरून शुद्ध रस ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे चविष्ट आणि स्वादिष्ट ऊसाचा रस असल्याने नागरिकांची मोठी मागणी वाढली आहे. केवळ अनेक जणांना रसामध्ये वापरण्यात येणाऱ्या बर्फाची चिंता असल्याने अनेकजण विनाबर्फाच्या रसाची तसेच उसाचे ४१९, ८६०३२ हे गोड वाण असलेल्या रसामध्ये लिंबू, आद्रक तसेच, काळे मीठ, जलजीरा, मसाला यामुळे रसाची मागणी वाढली आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून व्यावसायात उतरलो आणि ९ वर्षांपूर्वी रसवंती गृह सुरू केले. त्यातूनच उदरनिर्वाह चालवत आहे. दिवसभरात शेकडो ग्राहक रसवंती गृहात येऊन रस पिऊन जातात. ग्राहकांच्या पसंतीनुसार रस दिला जातो. आरोग्याच्या दृष्टीने ऊसाचा रसाचे पेय अत्यंत योग्य आहे.
दत्तात्रय शेंडगे – व्यावसायिक
