बिग ब्रेकिंग! रतन टाटांच्या निधनानंतर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय 

देशाचे उद्योगमहर्षी आणि पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारने एक दिवसाचा शासकीय दुखावटा पाळण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.

या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.

रतन टाटा यांनी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री दोनच्या सुमारास त्यांचा पार्थिव रुग्णालयातून घरी नेण्यात आले. गुरुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 3.30 पर्यंत त्यांचे पार्थिव मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर वरळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल.

Leave a Comment