LPG Gas Cylinder : गॅस सिलेंडरच्या दरात ‘एवढ्या’ रुपयांनी घट

LPG Gas Cylinder : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आज (०१ एप्रिल २०२३) मोदी सरकारने नागरिकांना मोठी भेट दिली आहे. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ९१.५० रुपयांनी घट केली आहे.

तर, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच रक्कम द्यावी लागणार आहे. दिल्लीत आजपासून १९ किलो व्यावसायिक सिलिंडर २ हजार २८ रुपयांना मिळणार आहे. गेल्या माहिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ३५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आजपासून व्यावसायिक सिलिंडरची किंमत ९१. ५० रुपयांनी घट करण्यात आली आहे. दिल्ली आजपासून १९ किलो एलपीजी व्यावसायिक सिलिंडर २ हजार २८ रुपयांना मिळणार आहे. तसेच कोलकाता (२ हजार १३२), मुंबई (१ हजार ९८०) आणि चेन्नईमध्ये २ हजार १९२ रुपये इतकी किंमत असेल.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १ हजार ३ रुपये आहे.

तसेच कोलकातामध्ये १ हजार १२९ रुपयांना उपलब्ध असेल. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १ हजार १०२ रुपये आहे. चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १ हजार ११९ रुपये मोजावे लागतील.

Leave a Comment