राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळेच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो असं म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पवारांवर खापर फोडलं होतं.
पण, काल शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत(Uday Samant) आणि शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची भेट घेतली.
या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काल दुपारी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले. अचानक शिवसेनेचे नेते सिल्व्हर ओकवर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली.
या भेटी वेळी प्राध्यापक प्रदीप ढवळ हे देखील उपस्थित होते. ही भेट कशा संदर्भात होती या संदर्भात कोणाताही खुलासा करण्यात आला नसल्यामुळे भेटीचे कारण गुलदस्त्यातच असल्याचं समजतंय. या तिन्ही नेत्यामध्ये कुठल्या मुद्यावर चर्चा झाली. याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.
