बिग ब्रेकिंग! बाळासाहेब थोरातांच्या शिष्टाईला यश, अखेर काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर 

महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) यांच्याशी जागा वाटपासंबंधी अनेक बैठका पार पडल्यानंतर, तिन्ही पक्षांच्या समन्वयातून अंतिम समीकरण ठरल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने गुरुवारी ४८ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली.

काँग्रेस पक्षाने पहिल्या उमेदवारी यादीत अपेक्षप्रमाणे विद्यमान आमदारांना स्थान दिलेले आहे. तर वादाच्या जागांवर लगोलग उमेदवार जाहीर करणे टाळले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षाने परंरागत साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना संगमनेर मतदारसंघातून, ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड विधानसभा मतदारसंघातून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना चिमूर विधानसभा मतदारसंघातून तसेच ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांना भोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

गेली अनेक दिवस शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून जोरदार तंटा सुरू होता. विशेषत: विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवर दोन्ही पक्षांत खेचाखेची सुरू होती. काँग्रेसचे नेते आणि नाना पटोले यांच्यात तर काही जागांवरून अक्षरश: शाब्दिक युद्ध झाले. त्यामुळे जागावाटपाच्या अनेक बैठका पार पडूनही अंतिम समीकरण निश्चित होत नव्हते. महाविकास आघाडी तुटतेय की काय? अशा चर्चाही यामुळे झाल्या. अशा सर्व कारणांमुळे अखेर काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाला मध्यस्थी करावी लागली. त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावून घेतले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी चेन्नीथला आदी नेत्यांसोबत चर्चा करून एकएक जागेवर चर्चा करून उमेदवारांची निश्चिती केली. शिवसेना नेतृत्वाशी चर्चा करण्याची जबाबदारी काँग्रेसने ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली. थोरात यांच्या शिष्टाईला यश आल्याने अखेर काँग्रेसने गुरुवारी पहिली उमेदवार यादी जाहीर केली.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार

अक्कलकुवा – ॲड. के.सी. पाडवी

शहादा- राजेंद्रकुमार गावित

नंदुरबार – किरण दामोदर तडवी

नवापूर – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक

साक्री – प्रविण बापू चौरे

धुळे ग्रामीण- कुणाल रोहिदास पाटील

रावेर- ॲड. धनंजय शिरीष चौधरी

मलकापूर- राजेश पंडितराव एकाडे

चिखली- राहुल सिद्धिविनायक बोंद्रे

रिसोड- अमित सुभाषराव झोनक

धामणगाव रेल्वे- विरेंद्र जगताप

अमरावती- डॉ. सुनील देशमुख

तिवसा- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर

अचलपूर- अनिरुद्ध देशमुख

देवळी – रणजीत कांबळे

नागपूर दक्षिण पश्चिम- प्रफुल गुडधे

नागपूर मध्य – बंटी शेळके

नागपूर पश्चिम- विकास ठाकरे

नागपूर उत्तर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत

साकोली- नाना पटोले

गोंदिया – गोपालदास अग्रवाल

राजुरा- सुभाष धोटे

ब्रह्मपुरी- विजय वडेट्टीवार

चिमूर- सतीश वारजूकर

हदगाव – महादेवराव पवार पाटील

भोकर – तिरुपती बाबूराव कदम कोंडेकेर

पाथरी- सुरेश वरपुडकर

नायगाव- मीनल पाटील

फुलंब्री- विलास औताडे

मीरा भाईंदर- सय्यद मुजफ्फर हुसेन

मालाड पश्चिम – अस्लम शेख

चांदिवली- मोहम्मद आरिफ नसीम खान

धारावी – ज्योती एकनाथ गायकवाड

मुंबादेवी- अमिन पटेल

पुरंदर- संजय जगताप

भोर – संग्राम अनंतराव थोपटे

कसबा पेठ- रवींद्र धंगेकर

संगमनेर- बाळासाहेब थोरात

शिर्डी- प्रभावती घोगरे

लातूर ग्रामीण- धीरज विलासराव देशमुख

लातूर शहर- अमित देशमुख

कराड दक्षिण- पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर दक्षिण- ऋतुराज पाटील

करवीर- राहुल पाटील

हातकणंगले -राजू आवळे

पलूस-कडेगाव- विश्वजीत कदम

जत – विक्रमसिंह सावंत

Leave a Comment