पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांचे वेळापत्रक जाहीर, वाचा कुठं होणार सभा….

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचा महाराष्ट्र दौरा निश्चित झाला असून विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारासाठी पंतप्रधान 8 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येणार आहेत. चार दिवसांत 9 सभांचे नियोजन करण्यात आले आहे.

8 नोव्हेंबरला महायुतीची पहिली मोठी सभा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभांचा नारळ फुटणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील प्रचारसभांमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर यांसह विविध ठिकाणांचा समावेश आहे.

चार दिवसात 9 सभा-

नियोजित कार्यक्रमानुसार 8 नोव्हेंबरला धुळे, नाशिक, 9 नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, 13 नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि 14 नोव्हेंबर रोजी संभाजी नगर, नवी मुंबई व मुंबई याठिकाणी मोदींच्या सभा होणार आहेत.

Leave a Comment