महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.
अशातच वेगवेगळ्या संस्थांकडून निवडणुकीचे सर्वे समोर येऊ लागले आहेत. इलेक्टोरल एजचे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबतचे प्री-पोलने केलेल्या सर्वेक्षणातून काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे दिसत आहे. सर्वेक्षणात MVA च्या बाजूने सर्वात जास्त कल असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती या पक्षांनी सुरुवात केली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी टाकली आहे.इलेक्टोरल एज प्री-पोल सर्वेक्षणानुसार, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात बहुमत मिळत असल्याचं दिसत आहे. एमव्हीएला राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 157 जागा मिळू शकतात.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो, काँग्रेसला सर्वाधिक 68 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 44 जागा आणि ठाकरे गटाला 41 जागा मिळू शकतात. त्यासोबतच समाजवादी पक्षाला 1, सीपीआयएम 1 आणि पीडब्ल्यूपीला 2 जागा मिळू शकतात
