रोहित पवार, मोनिका राजळेंना या निवडणुकीत आम्ही पाडणारच…”या” नेत्याचा इशारा 

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात उभे ठाकलेले ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. या निवडणुकीनंतर मनोज जरांगे हे इतिहासजमा होतील असे हाके यांनी म्हटले.

मनोज जरांगे यांची यादी जाहीर केल्यानंतर आम्ही ओबीसी आघाडीची यादी जाहीर करणार असल्याचे हाके यांनी सांगितले.

लिस्टमधील ‘या’ नेत्यांची नावे केली जाहीर

आमची यादी तयार आहे. फक्त जरांगे पाटलांच्या यादीची वाट पाहत आहोत. या निवडणुकीत रोहित पवार, राजेश टोपे, तानाजी सावंत, मोनिका राजळे हे आमच्या हिटलिस्टवर आहेत. त्यांना आम्ही पाडणारच आहोत असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

Leave a Comment