भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही तर…. देवेंद्र फडणवीसांच मोठं वक्तव्य 

एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य केले होते. त्यावर भाजपचे धुरंधर नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, महायुतीचा मुख्यमंत्री होईल अशी प्रतिक्रीया दिली.

एका अर्थाने महायुतीत भाजपसोबतच इतर घटक पक्ष मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत हे त्यांनी स्पष्टच केले आहे.

काँग्रेसचे मुंबईतील नेते आणि पाचवेळा नगरसेवक राहीलेले रवी राजा यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.

 

महायुतीचा मुख्यमंत्री होणार

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज ठाकरे यांनी महायुतीचे सरकार येईल आणि भाजपचा मुख्यमंत्री होईल असं त्यांनी वक्तव्य केले मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या शुभेच्छा मी आभाराने स्वीकारतो पण भाजपचे नाही तर महायुतीचे सरकार येणार आणि भाजपचा नाहीतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.

राज ठाकरे आम्ही एकत्र राहू..!

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजून आमची सर्व बोलणी सुरु आहे. राज ठाकरे, मुख्यमंत्र्‍यांशी चर्चा होत आहे. आमचा प्रयत्न आहे की, आम्ही सर्व एकत्र राहू. राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. क्षेत्रीय अस्मितेला भाजपचे नेहमीच समर्थन राहीले आहे. त्यासोबतच राष्ट्रीय अस्मिताही महत्वाची ती म्हणजे हिंदुत्व आणि राष्ट्रीय हिंदुत्व राज ठाकरे यांनी स्वीकारली आहे.

Leave a Comment