मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींना धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्यतो टाळावेत.
मिथुन : तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्क : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
सिंह : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.
तूळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्द वाढेल.
वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
धनू : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. महत्त्वाची वार्ता समजेल.
मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.
कुंभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
मीन : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
