नाना पटोले भावूक, पदाधिकारी ढसाढसा रडले, कॉंग्रेसमध्ये राजीनामे सत्र सुरू…

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसचं पानिपत झालं. काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या पण मोजक्याच जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. तर दिग्गज नेते पराभूत झाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अवघ्या 208 मतांनी विजयी झाले आहे. काँग्रेसच्या लाजीरवाण्या पराभवामुळे सगळेच नेते हादरले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. यावेळी नाना पटोलेही भावुक झाले.

नाना पटोले आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. निकालाबद्दल त्यांनी चर्चा केली. यावेळी झालेल्या झालेल्या पराभवामुळे सगळेच पदाधिकारी खचले होते. यावेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कमिटी अंतर्गत परिवहन विभागाचे अध्यक्ष अमित मेश्राम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमित मेश्राम यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. यावेळी पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर झाले. नाना पटोले यांच्या गळ्यात पडून पदाधिकारी ढसाढसा रडले. यावेळी नाना पटोले सुद्धा भावुक झाले होते. नाना पटोले सुद्धा पदाधिकाऱ्यांचा आक्रोश पाहून भावुक झाले होते. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची समजूत काढली.

Leave a Comment