राज्यातील काही भागांत अजूनही ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ होत आहे. या कारणामुळे राज्यात पुन्हा 8 किंवा 9 डिसेंबरपासूनच थंडीचा प्रभाव जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील पावसाचे येलो अलर्ट संपले आहेत. मात्र काही भागात अजूनही ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे किमान तापमान 21 ते 23 अंशांवर, तर कमाल तापमान 31 ते 32 अंशांवर गेल्याने राज्यात सर्वंत्र उकाडा जाणवत आहे.
उत्तर भारतात 8 डिसेंबरपासून नवा पश्चिमी चक्रवात सक्रिय होत असल्याने त्यानंतरच महाराष्ट्रात तिकडून शीतलहरी येण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
