सभागृहात २८८ आमदारांना हंगामी विधानसभा अध्यक्ष आज आणि उद्या शपथ देणार आहेत. यात नव्या ७८ आमदारांचा समावेश आहे. पहिल्यांदाच आमदार झालेले अनेकजण आज शपथ घेतील. पहिल्यांदाच आमदार झालेले भाजपचे एक नेते चुकून विरोधी बाकांवर बसले होते. अजित पवार यांना हे दिसताच त्यांनी नवनिर्वाचित आमदाराला हाताला धरून सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसवलं.
विधानसभेच्या सभागृहात पहिल्यांदाच आमदार म्हणून आलेले हेमंत रासने विरोधी पक्षाच्या बाकांवर बसले होते. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी हेमंत रासने यांना हाताला धरून बाजूला आणलं आणि सत्ताधारी बाकांवर बसवलं. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून हेमंत रासने हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला.
