देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यंमत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) झालेल्या या शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्री तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते मात्र या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते.
मात्र पुण्यात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नसल्याचे खरे कारण शरद पवार यांनी सांगितले आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता मात्र संसदेचे अधिवेशन सुरू होतं ते सोडून येणं शक्य नव्हतं म्हणून मी आलो नाही. असा खुलासा त्यांनी यावेळी केला तसेच विधानसभा विरोधी पक्ष नेत्याबद्दल विधानसभा निर्णय घेईल याबाबत आम्ही काय सांगायचं. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
