बिग ब्रेकिंग! पारनेरमध्ये नगरसेवकाच धक्कादायक कृत्य, शहरात खळबळ 

पारनेर येथे नगरसेवकाने गणपती देवस्थान ट्रस्टच्या जमिनीच्या वादातून ट्रस्टीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गणपती देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केल्याच्या रागातून पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक युवराज पठारे आणि इतरांनी देवस्थान समितीचे सदस्य सुनील चौधरी यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात युवराज पठारे, नामदेव पठारे, यशवंत पठारे, कुंडलिक पठारे आणि इतर सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुपा रोडवरील गणपती देवस्थानच्या जागेवर पठारे कुटुंबियांनी केलेले अतिक्रमण काढावे म्हणून 2018 मध्ये देवस्थानच्या ट्रस्टींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पारनेर नगरपंचायतीकडे अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये नोटीस पाठवल्या होत्या. सात दिवसांपूर्वी नगरपंचायतच्यावतीने अतिक्रमण धारकांनाही नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

याचाच पाठपुरावा करण्यासाठी देवस्थानचे सदस्य सुनील चौधरी हे नगरपंचायतमध्ये गेले असता तिथे येत नगरसेवक युवराज पठारे आणि इतरांनी चौधरी यांना उचलून नेले आणि घरी जाऊन बांबूने आणि लाथाबुक्याने बेदम मारहाण केली, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने पारनेर तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment