मंगळवेढा शहर परिसरात एका तरुण मुलाला ऑनलाइन व्हिडीओ कॉल बाहेरच्या राज्यातील एका महिलेने करुन त्याला बाथरुममध्ये जावून नग्न हाेऊन व्हिडीओ कॉल करण्याचा सल्ला देवून त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार घडल्याने त्या तरुणास मानसिक धक्का बसून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
दरम्यान बाहेरच्या राज्यातील असे व्हिडीओ कॉल करण्याचा सल्ला कोणी दिल्यास त्यास बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या घटनेची हकीकत अशी की, मंगळवेढा परिसरातील एका तरुणाला दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता फेसबुकवर ऑनलाईन नंबरवरुन त्याला व्हिडीओ कॉल करण्याचा सल्ला दिला. सदर महिलेने बाथरुम मध्ये जावून नग्न होवून व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. मुलाने त्या महिलेचे ऐकून नग्न होवून व्हिडीओ कॉल केला. दरम्यान हे कृत्य सदर महिलेने रेकॉर्डींग करुन त्या तरुणास पैशाची मागणी केली. अन्यथा तुझ्या नातेवाईकांना हा व्हिडीओ कॉल पाठवून बेइज्जत करण्याचा इशारा दिला. हा मानसिक धक्का त्याला सहन न झाल्याने त्या मुलाने चक्क एका विहिरीत उडी घेवून आत्महत्या कोली आहे.
घरच्यांनी सदर मुलाची वाट पाहून तो न आल्याने पोलीसात मिसींग दाखल केली होती. आत्महत्येनंतर तीन चार दिवसांनी मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगल्याने ही घटना उघडकीस आली.
