विद्या प्रबोधिनी प्रशालेची विद्यार्थिनी बनली सीए…

संगमनेर (DSNews24) नुकताच काही दिवसांपूर्वी देशातील सीए परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावची सुकन्या व विद्याप्रबोधिनी प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा उत्तम धुळगंड हिने घवघवीत यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल विद्या प्रबोधिनी प्रशालेत तीचा सन्मान आयोजित केला होता. याप्रसंगी ऋतुजा ने बारावीच्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला व मार्गदर्शनही केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री इंद्रजीत पाटील खेमनर, उपाध्यक्ष शंकरराव पाटील खेमनर, सर्व संचालक मंडळ, रजिस्ट्रार होळकर सर, प्राचार्य गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, इन्चार्ज कोळेकर सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी ऋतुजाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले!

Leave a Comment