महाराष्ट्र हादरला… सख्ख्या भावांची निर्घृण हत्या

बीड : मागील काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना बीडमध्ये आता दुहेरी हत्याकांड घडलं आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आदिवासी पारधी समाजातील जमावाने हल्ला करत दोघांचा जीव घेतला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी पारधी समाजातील तीन सख्खा भावांवर त्याच समाजातील जमावाने लोंखडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहीरा गावात घडली. अजय विलास भोसले, भरत विलास भोसले असं मृत पावलेल्या भावंडाची नावं आहेत. तर कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला आहे. किरकोळ वादातून हा गंभीर प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे काल रात्री आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला चढवला.

या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला. असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनतेली सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हा खून का आणि कोणत्या कारणावरुन केला? हे अद्याप समजले नाही. दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

Leave a Comment