मोठी बातमी! सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात? कोर्टाने दिला महत्वाचा आदेश…..

छत्रपती संभाजीनगर : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी रान उठवलं आहे. अशातच आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुरेश धस यांच्याविरुद्ध निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) महेबुब इब्राहिम शेख यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे.

या याचिकेत सुरेश धस यांच्यावर धार्मिक कारणावरून मतं मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. औरंगाबाद खंडपीठात सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सुरेश धस यांनी मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडीओ व्हायरल केले, शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतले, असे आरोप करण्यात आले आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मागणी करूनदेखील फॉर्म ‘१७ सी’ची प्रत त्यांना दिली नाही. निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडीओग्राफी, तसेच सीसीटीव्ही फुटेज यांची मागणी करून देखील त्यांना ते पुरविलं गेलं नाही, असं देखील याचिकेत म्हटलं गेलं आहे.

यावरून निवडणूक अधिकारी विजयी उमेदवाराला झुकतं माप देत होते असं दिसतं, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोग यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात आली की काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. औरंगाबाद खंडपीठातील पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे.

1 thought on “मोठी बातमी! सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात? कोर्टाने दिला महत्वाचा आदेश…..”

  1. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूक दरम्यान काय झाले .कसा प्रचार झाला.धार्मिक स्थळांमध्ये कशा बैठका झाल्या ह्याचा विचार केला तर सगळे विरोधक कोमात जातील.शिवाय हवाला रॅकेट ने पैसे पुरवले गेले धर्मांध मतदाराना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी

    Reply

Leave a Comment