पारनेरमध्ये भूमिपुत्रांचा झंझावात सुरूच…आणखी “या” गावांमध्ये कृती समितीची स्थापना 

पारनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेने दुष्काळी गावांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विडा उचलला आहे. तसेच हक्काचे पाणी मिळण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना व पारनेर तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली गाव तिथे कृती समिती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला अक्षरशः शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच तिखोल, कासारे या गावात देखील कृति समितीची स्थापना करण्यात आलीय. वाड्या वस्त्यांवरील शेतकरी बांधव या अभियानात स्वखुशीने सहभागी होत आहेत.

११४ गावांमध्ये ही कृती समितीची स्थापना करण्यात येणार असून बऱ्याच गावांमध्ये कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण दुष्काळी गावांमध्ये कृती समितीची स्थापना करण्याचा उद्देश पुर्ण होणार आहे. गावोगावी शेतकऱ्यांची एकजूट होत आहे आहे. त्यामुळे भूमिपुत्र शेतकरी संघटनेची ताकद वाढत चालली आहे. संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या लढ्यात हजारो शेतकरी एकजूट होताना दिसत आहे.

यावेळी मा. सभापती अरुण ठाणगे, बाळशिराम पायमोडे, अशोक आंधळे, किरण वाबळे,मोहन रोकडे, अन्सार पटेल, नंदू साळवे,प्रवीण खोडदे, सरपंच दत्ता ठाणगे, मा. चेअरमन नागचंद ठाणगे, अश्विन मंचरे, बाळू ठाणगे, बाळासाहेब ठाणगे, हरिभाऊ ठाणगे, संतोष खाणकर,शामकांत ठाणगे, अनिल ठाणगे, संकेत ठाणगे, राजू ठाणगे, देवराम निमसे, पोपट नरड, बबन दातीर, तुळशीराम लगड, सखाराम नगर, निवृत्ती कासुटे, गोवर्धन खरात, देवराम घनवट, गोकुळ निमसे, नबाजी मंचरे, शिवाजी ठाणगे, राजेंद्र ठाणगे, राघू साळवे, साहेबराव ठाणगे, शांताराम ठाणगे, रामभाऊ निमसे, तुळशीराम शिंदे, विठ्ठल घनवट, रामचंद्र साळवे, रोहिदास नरड, तुकाराम पानमंद ,रघुनाथ निमसे, धोंडीभाऊ नरड, बन्सी खरात, जीजाबापू नरड, रामभाऊ दातीर, मिनीनाथ पानमंद यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment