शेतकऱ्यांसाठी आमदार अमोल खताळ थेट गाठणार साकूर सब्टेशन….

संगमनेर (DSNews24 ) वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तसेच अपुर्ण दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे साकूर पठारभाग परिसरातील शेतकरी व नागरीक त्रस्त असल्याने या विषयाकडे युवा नेते गुलाबराजे भोसले,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख, अमित धुळगंड,खांबेचे सरपंच रवींद्र दातीर व पिंपळगाव देपा चे उपसरपंच रणजीत ढेरंगे यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांना निवेदन देऊन लक्ष वेधले.

यावेळी आमदार अमोल खताळ पाटील यांनी त्वरीत दखल घेऊन सोमवार दि.17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वा.साकूर सबस्टेशन येथे महावितरणच्या अधिकार्‍यांसोबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आमदार अमोल खताळ साकूर पठारभाग परिसरातील सर्व शेतकरी व नागरिकांच्या महावितरण संदर्भातील समस्या जाणुन घेणार आहेत व यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी अधिकार्‍यांना सुचना देणार आहेत, यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गुलाबराजे भोसले, रऊफ शेख,  अमित धुळगंड, रवींद्र दातीर, रणजीत ढेरंगे यांनी केले आहे.

Leave a Comment