संगमनेर(DSNews24/किरण पुरी) संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील भाजप संगमनेर तालुका पूर्व मंडळाचे अध्यक्ष गुलाब भोसले यांनी आपल्या स्वखर्चातून पिंपळगाव देपा येथील हिराबाई अभंग या परिवाराला नवीन घर बांधून देत खऱ्या अर्थाने त्यांना दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करत एक समाजा समोर आगळावेगळा आदर्श घालून दिला असल्याचे गौरवोद्गार आ.अमोल खताळ यांनी काढले.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देपा येथील अभंग परिवाराचे घर आगीत जळून खाक झाले होते, त्या परिवाराला संगमनेर तालुक्यातील पठार भागाचे नेते आणि भाजपाचे पूर्व मंडळाचे अध्यक्ष गुलाब भोसले आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा पिंपळगाव देपाचे उपसरपंच रणजीत ढेरंगे यांनी स्वखर्चातून बांधून दिलेल्या घराचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे, आमदार किरण लहामटे यांचे पुतणे मुकुंद लहामटे, भाजपचे तालुकाप्रमुख गुलाब भोसले, सरपंच माऊली मिंडे, उपसरपंच आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रणजीत ढेरंगे, महिला तालुकाप्रमुख संगीता बांबळे, खांबा गावचे सरपंच रवींद्र दातीर, रऊफ शेख, अमित धुळगंड, सचिन गुळवे, बाबासाहेब गुळवे, किरण गुळवे, मयूर गुळवे यांच्यासह पिंपळगाव देपा परिसरासह पठार भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, गुलाब भोसले यांनी त्यांच्या आयुष्यात आत्तापर्यंत सार्वजनिक ठिकाणी खूप मदत केली असेल. मात्र एखाद्या गोरगरिबाला व्यक्तिगत मदत करण्याचं गुण त्यांच्यात असल्यामुळे त्यांनी पिंपळगाव देपाच्या अभंग परिवाराला एक चांगल घर बांधून देत वचनपूर्ती केली आहे. दिलेला शब्द ते कधी मोडत नाही, त्यामुळे त्यांना भविष्य या भागांत उज्वल राहील. जर माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याचा मुलगा तालुक्याचा आमदार होऊ शकतो. तर आगामी काळात तुमच्या मधीलच कुणीतरी एखादा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा सदस्य होऊ शकतो, त्यामुळे कधीही कुणालाही कमी लेखू नये असा सल्ला आमदार खताळ यांनी दिला.
भाजपाध्यक्ष आणि अभंग परिवाराला घर बांधून देण्याची वचनपूर्ती करणारे गुलाब भोसले म्हणाले की, साकुर पठार भागात आत्तापर्यंत आपण अनेक चारा छावण्या टाकल्या, सायकली वाटल्या असे अनेक सामाजिक कामे केली आहेत. मात्र पिंपळगाव देपा येथील अभंग परिवाराचे ज्यावेळी घर आगीत जळून खाक झाले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रु पाहून मलाही खूप वाईट वाटले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या परिवाराला स्वखर्चातून घर बांधून दिले तर त्यांचा आशीर्वाद निश्चित मिळेल, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण या अभंग परिवाराला नवीन घर बांधून देण्याचे वचन दिले होते. आणि ते दिलेले वचन पूर्ण केले आहे. त्या परिवाराच्या डोळ्यांमध्ये सुखाचे अश्रू आले यातच मला खऱ्या अर्थाने समाधान आहे. आणि मला या परिवाराला घरबांधून देण्यासाठी सर्वांनीच एक खारीचा वाटा उचलला त्या मुळेच मी ही वचनपूर्ती करू शकलो असे त्यांनी गोरोदगार काढले.
यावेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, बाबासाहेब कुटे, रोहिणी महाराज राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
आमचे सर्व जळून खाक झाले आम्हाला राहायला घर नव्हते. काय करावे आणि काय नाही हे आम्हाला कळत नव्हते मात्र देवदूता सारखे गुलाब भोसले हे आमच्या मदतीला धावून आले आणि आमच्या परिवाराला जगण्याची उमेद दिली हे सांगताना हिराबाई अभंग यांच्या कन्या पुनम गवळी यांना अक्षरशा गहिवरून आले होते.
अशी घडली ही घटना
पिंपळगाव देपा येथील घराला काही महिन्यापूर्वी अचानक आग लागून सर्व संसार धान्य दागदागिने पैसे जळून खाक झाले होते आणि हे अभंग कुटुंबीय उघड्यावर पडले होते. या घटनेची माहिती आमदार अमोल खताळ यांना समजतात त्यांनी पठार भागातील भाजप नेते गुलाब भोसले व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रणजीत ढेरंगे यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांना जी काही मदत लागेल ती करा असे सांगितले. त्यानंतर गुलाब भोसले यांनी आपले सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून थेट पिंपळगाव देपा गाव गाठले. मात्र असं म्हणतात ना कोण कुणासाठी देवदूत म्हणून मदतीला धावून येतो हे नशीबात लिहिलेल नसतं अन् तेच अभंग कुटुंबासोबत घडलं. या संकटकाळात भाजपचे तालुका अध्यक्ष गुलाब भोसले तातडीने अभंग कुटुंबांच्या भेटीला गेले आणि त्यांनी त्या कुटुंबीयांची सर्व परिस्थिती जाणून घेतली. तसेच त्या परिवाराला किराणा आणि धान्य उपयोगी वस्तूंची मदतही केली. त्यावेळी अभंग कुटुंबांच्या डोळ्यात फक्त नी फक्त दुःखाचे अश्रू दिसत होते. आम्हाला राहायला घरचं नाही. त्यामुळे हा किराणा बाजार आणि धान्य ठेवायचे कुठे असा प्रश्न अभंग परिवाराला पडला होता. अभंग परिवाराच्या दुःख दायी वेदना लक्षात घेऊन गुलाब भोसले यांनी क्षणाचाही विलंब न करता तुम्हाला मी माझ्या स्व खर्चातून घर बांधून देतो असे वचन दिले होते आणि दोन ते तीन महिन्यांत नवीन घर बांधून देत वचन पूर्ण केले.
