मेष : उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
मिथुन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
कर्क : कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वृश्चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.
धनू : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.
मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
मीन : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
