मोठी बातमी! महाराष्ट्रातील २१ वर्षीय तरूणाचा कोरोनामुळे मृत्यू 

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना ठाणे जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 21 वर्षीय तरुणाचा आज पहाटे 6 वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला. हा तरुण मुंब्रा येथील रहिवासी असून, ठाणे जिल्ह्यातील यंदाचा कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाला 22 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली, जी 23 मे रोजी पॉझिटिव्ह आली. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने आज पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment