मुंबई, पुण्यासह ३० जिल्ह्यात यलो अलर्ट जारी, पुढील तीन दिवस…

मुंबई – मे महिन्यात पावसाची दमदार हजेरी लावल्यानंतर काही दिवसांची विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा जोमात येण्याची शक्यता आहे. राज्यात येत्या तीन दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यांसह, विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह तब्बल ३० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हं आहेत. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला होता. मान्सूनची गती मंदावल्याने पावसाला उघडीप मिळाली होती. मात्र, आता पुन्हा हवामान बदलत असून, राज्यात अनेक भागांत ढगाळ वातावरण आणि तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत

कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट?

हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी

मध्य महाराष्ट्र : पुणे (घाटमाथ्यासह), नाशिक, जळगाव, धुळे, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव

विदर्भ : नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा

Leave a Comment