अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले……

मुंबई – अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का हा प्रश्न आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला. यावेळी त्यांनी खास शैलीत उत्तरं दिल.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“शरद पवार -अजित पवार एकत्र येतील का? हे तेच सांगू शकतात, त्यांनी पूर्णविराम दिलाय का? तेच सांगू शकतात. यातल्या कुठल्याच गोष्टीवर माझ्याकडे अशी शक्ती नाही की त्यांच्या मनात शिरुन त्यांच्या मनातलं जाणून तुमच्यापुढे ठेवू शकेन.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जयंत पाटील सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा हे त्यांना मुक्त करणार असल्याचं माहीत असल्याने म्हणाले? त्यांच्या मनात काही दुसरं आहे का? हे सगळं समजून घ्यावं लागेल. असं देवेंद्र फडणवीस मिश्किलपणे म्हणाले.

अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत. मात्र दोन्ही नेत्यांनी याबाबत भाष्य केलेलं नाही. आता देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता ते दोघंच याबाबत सांगू शकतात असं म्हटलं आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत या पार्श्वभूमीवर नेमकं काय होतं ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

Leave a Comment