नांदूर पठारच्या झेडपी शाळेत चिमुकल्यांच रविंद्र राजदेवांकडून स्वागत

पारनेर (DSNews24/किरण पुरी) विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस चैतन्यमय व अविस्मरणीय व्हावा यासाठी पारनेर तालुक्यातील नांदूर पठार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या दिवशी शाळा प्रवेशावेळी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करून शाळेचा पहिला दिवस चैतन्यमय बनवण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात 16 जून 2025 रोजी सर्वत्र उत्साहात आणि आनंदात करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर पठार येथे इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे निलेश लंके प्रतिष्ठान चे तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी मा. सरपंच भानुदास आग्रे, निलेश लंके प्रतिष्ठान सोशल मिडिया अध्यक्ष रविंद्र घोलप, भानुदास चौधरी, बाळासाहेब राजदेव, रंगनाथ राजदेव, बाबाजी पानसरे, संदेश आग्रे, जाधव गुरुजी, वाळुंज गुरुजी उपस्थित होते.

शाळेच्या पहिल्या दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी मुलांना चॉकलेट, खाऊ वाटप, गोड जेवण देण्यात आले.

यावेळी रविंद्र राजदेव यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी रविंद्र राजदेव यांनी शाळेच्या अडीअडचणी संदर्भात माहिती देखील घेतली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहिल असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.

Leave a Comment