संगमनेर(DSNews24/किरण पुरी) विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस चैतन्यमय व अविस्मरणीय व्हावा यासाठी संगमनेर तालुक्यातील साकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या दिवशी शाळा प्रवेशावेळी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करून शाळेचा पहिला दिवस चैतन्यमय बनवण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात 16 जून 2025 रोजी सर्वत्र उत्साहात आणि आनंदात करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकूर येथे इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ग्रामोदय ट्रस्टच्या अध्यक्षा मैथिली सत्यजित तांबे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
शाळा प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास ट्रस्टच्या अध्यक्षा मैथिली सत्यजित तांबे तर व्यासपीठावर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, जयराम ढेरंगे, रूपेश धुळगंड, सचिन खेमनर, अधिव्याख्याता मुकंद दहिफळे, शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण राऊत, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा रुपाली बर्डे, उपाध्यक्ष मन्सूर पटेल, मुख्याध्यापक शायदा शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या प्रवेशाद्वारावर आकर्षक रांगोळी काढण्यात आलेली होती. तसेच फुलांची देखील सजावट करण्यात आली होती. तसेच इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या २५ मुलांच खास स्वागत करण्यात आले. शाळेत पहिले पाऊल टाकले म्हणून पायांचे ठसे घेण्यात आले. तसेच त्यांची गावातून ट्रक्टरवरून मिरवणूक काढण्यात आली. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक व शूजचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी मुलांना चॉकलेट, खाऊ वाटप, गोड जेवण देण्यात आले.
यावेळी मैथिली तांबे यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच माझी मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत साकूर शाळा तालुक्यात तृतीय येऊन एक लाख रुपयांच बक्षिस मिळाल्याबद्दल मैथिली तांबे यांनी शिक्षक वृदांच अभिनंदन केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष जाधव यांनी केले तर प्रास्ताविक संतोष झावरे यांनी मानले. तसेच आभार विकास मिसाळ यांनी मानले.
