खा. निलेश लंकेडून रविंद्र राजदेवांच कौतुक, रेशनकार्ड कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

पारनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून शासनाची प्रत्येक योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचावी त्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने रेशनकार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये आपली सेवा आपल्याच दारी हा अभिनव उपक्रम सुरू आहे. पळसपूर येथे देखील या उपक्रमासाठी सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या प्रत्येक कॅम्पला दिपक आण्णा लंके भेट देत अडीअडचणी समजून घेत आहेत. विशेषतः रविंद्र राजदेव यांच्या या कामाच खासदार निलेश लंके यांनी देखील कौतुक केले आहे.

खरोखर सर्वसामान्य जनतेला नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्ड online करणे, आधार कार्ड अपडेट करणे, बांधकाम कामगार कार्ड काढणे, नवीन मतदार नाव नोंदणी करणे, विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड वरील नाव कमी करणे व दुरूस्ती करणे यासाठी वारंवार तहसील कार्यालयात जाऊन उंबरठे झिजवावे लागतात. मात्र एका हेलपाट्यात काम होईल ही गॅरंटी देखील नसते मात्र विनाकारण एक दिवस वाया जातो. मात्र माजी सरपंच रविंद्र राजदेव यांनी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात कॅम्प राबवून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या कॅम्पमध्ये एकाच ठिकाणी सर्व कामे करून मिळणार आहे.

विशेषतः या कॅम्पमध्ये आतापर्यंत २ हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच या कॅम्पला अक्षरशः महिला, पुरूष तसेच ज्येष्ठ नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कॅम्पसाठी स्वयंसेवक मदत करत आहे. माजी सरपंच रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून गावोगावी कॅम्प राबवत असल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Comment