संगमनेर(DSNews24/किरण पुरी) मुळा नदीच्या उगमस्थानी अकोले तालुक्यात होत असलेल्या पावसाने जोर पकडल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातून जाणारी ही नदी वाहती झाली आहे.
हरीचंद्रगड परिसरात उगम पावणारी मुळा नदी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठे, घारगाव, बोरबन, आंबी खालसा, अकलापूर व साकुर परिसरातून जाते. सध्या या नदीच्या उगमस्थानी होत असलेल्या पावसाने मुळा नदीला पूर आला आहे.
