पारनेर – वारणवाडीत रेशनकार्ड कॅम्पसाठी उस्फुर्त प्रतिसाद, ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण

पारनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात शासनाची प्रत्येक योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचावी त्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने रेशनकार्ड व बांधकाम कामगार कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये आपली सेवा आपल्याच दारी हा अभिनव उपक्रम सुरू आहे. या उपक्रमासाठी सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज वारणवाडी येथेही कामटवाडी, पारदरा, हांडेवाडी, गोडसेदरा येथील ग्रामस्थांसाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या आधीच्या कॅम्पसाठी देखील ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान या कॅम्पमध्ये नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्ड online करणे, आधार कार्ड अपडेट करणे, बांधकाम कामगार कार्ड काढणे, नवीन मतदार नाव नोंदणी करणे, विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड वरील नाव कमी करणे व दुरूस्ती करणे आदि सेवा दिली जाणार आहे. मात्र यासाठी वारंवार तहसील कार्यालयात जाऊन उंबरठे झिजवावे लागतात. मात्र एका हेलपाट्यात काम होईल ही गॅरंटी देखील नसते मात्र विनाकारण एक दिवस वाया जातो. मात्र माजी सरपंच रविंद्र राजदेव यांनी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात कॅम्प राबवून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या कॅम्पमध्ये एकाच ठिकाणी सर्व कामे करून मिळणार आहे.

विशेषतः या कॅम्पमध्ये आतापर्यंत २ हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच या कॅम्पला अक्षरशः महिला, पुरूष तसेच ज्येष्ठ नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कॅम्पसाठी स्वयंसेवक मदत करत आहे. आपली सेवा आपल्या दारी या सेवेबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून रविंद्र राजदेव यांनी हा उपक्रम चालू केल्याबद्दल कौतुक केले आणि आभार मानले .

वारणवाडी येथील या कॅम्पवेळी सरपंच संजय काशिद, भाऊसाहेब महाराज कोकाटे, विलास काशीद, नानाभाऊ काशीद, चेअरमन साहेबराव रोकडे, पाटील काशीद, हॉटेल रो हाउस चे मालक अभिमन्यु उर्फ बाल्याभाई कोकाटे, विनोद काशीद, विठ्ठल काशीद, पंडित गायखे, संकेत कोकाटे, विठ्ठल बेलकर, निलेश लंके प्रतिष्ठानचे भाऊसाहेब चौधरी, अशोक काशीद, विठ्ठल दुधवडे, एकनाथ दुधवडे, नांदूर पठाराचे मा.सरपंच भानुदास आग्रे, रविंद्र घोलप, अमोल गाडगे, तुकाराम कारंडे, नवनाथ मोरे, शुभम काळे, दिलीप डोमाळे, चीमा मधे, सुभाष दुधवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment