पारनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील खडकवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमनपदाच्या निवडी झाल्या आहेत. चेअरमनपदी धोंडीभाऊ शिंगोटे व व्हा. चेअरमन पदी मिराबाई हुलावळे यांची निवड झाली आहे.
या निवडीनंतर खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार केला. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
