कार्यकर्ता असावा तर असा, रऊफ शेख यांनी वेधले ‘या’ प्रश्नाकडे सीईओचे लक्ष

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु माध्यमाची शाळा असुन या ठिकाणी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरु आहेत. मात्र आठवी नंतर पुढील शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थी शाळाबाह्य होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढत आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख यांनी या प्रश्नाकडे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची भेट घेऊन लक्ष वेधले आहे.

तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ अंतर्गत इयत्ता आठवीला जोडुन इयत्ता नववी व दहावी चे वर्ग सुरु करण्याची विनंती लेखी निवेदनाद्वारे रऊफ शेख यांनी केली आहे.

तसेच नव्याने पदभार स्विकारलेल्या जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यासाठी रऊफ शेख यांनी शुभेच्छा दिल्या व विविध विषयांवर चर्चा केली.

संगमनेरचे आमदार अमोल खताळ व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांचीही भेट घेऊन रऊफ शेख यांनी निवेदन दिले असुन त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत जि.प.प्रशासनाला या मागणीचा विचार करण्यासाठी शिफारस केली आहे.

दरम्यान रऊफ शेख कायमच नवनवीन विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधतात. तसेच सामाजिक प्रश्नांना न्याय देण्याच उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यामुळे रऊफ शेख यांची कायमच चर्चा होत असते. एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. म्हणूनच नेता असावा तर असा अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Leave a Comment