संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या अनेक वर्षांपासुन संगमनेर आगाराची संगमनेर ते शिबलापुर मार्गे साकूर मुक्कामी बस संगमनेर आगाराकडुन अचानक बंद करण्यात आल्याने शिबलापुर, पानोडी, वरवंडी, कौठे मलकापुर, शेळकेवाडी, दरेवाडी या भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच प्रवाशांना रात्री परतण्यासाठी एसटी बसच नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.
या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख यांनी लेखी निवेदनाद्वारे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचे याकडे लक्ष वेधले. तसेच संगमनेर आगाराची ही शिबलापुर मार्गे संगमनेर ते साकूर ही मुक्कामी बस पुर्ववत सुरु करण्याची मागणी केली आहे.
रऊफ शेख यांच्या या मागणीची आमदार अमोल खताळ यांनी तातडीने दखल घेत थेट संगमनेर आगार व्यवस्थापकांना सुचना दिल्या आहे. तसेच सदर बस लवकरच सुरु करण्यात येईल असे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिल्याने ही बस पुन्हा सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रऊफ शेख यांनी या मागणीकडे विशेष लक्ष दिल्याने पठारभागातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
साकूर पठार भागासाठी काही नवीन बसेस ची मागणी केल्यावर प्रवाशांनी फोन करुन संगमनेर ते शिबलापुर मार्गे साकूर मुक्कामी बस बंद असल्याची माहिती देत खंत व्यक्त केली. ही बस बंद झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत असल्याने आमदार अमोल खताळ पा.यांची भेट घेत ही बस पुर्ववत सुरु करण्याची मागणी केली. आमदार अमोलभाऊंनी तत्काळ संगमनेर आगार व्यवस्थापक श्री.गुंड यांना फोनवर सुचना केली असुन लवकरच ही बस पुर्ववत सुरु करु असे आगार व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
रऊफ शेख – राज्य कार्यकारिणी सदस्य,भाजपा, अल्पसंख्यांक मोर्चा
